नमस्कार
एक वॉइस आर्टिस्ट म्हणून माझ्या गेल्या 25 वर्षांच्या audio प्रवासात अनेक टप्पे अनेक वळण पार करत ..आता एका पुन्हा एक नवा प्रवास सुरू करायचा मानस आहे ...AUDIOPUSTAK
आपण पुस्तक वाचतो नव्हे वाचता येऊ लागल्यापासूनच वाचत आलो आहोत ...पण आता काळाच्या ओघात ती वाचण..त्यासाठी वेळ काढण..हळूहळू कठीण होत चालल आहे..मनात असूनही पुस्तक वाचनासाठी वेळ सापडत नाही ...काही वेळेला वयोमाना नुसार ती वाचता येत नाहीत ...तसच शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालय पण मराठी साहित्य वाचायच आहे ..पण योग्य उच्चार माहीत नसल्यान वाचनात सहजता येत नाही ....अशावेळेला ती कोणी वाचली तर ? ती आपल्याला ऐकता आली तर ...लांबच्या प्रवासात ..काही काम करताना हे करण सहज शक्य आहे .
हा विचार मनात आला आणि त्यादिशेन माझा पुन्हा एक प्रवास सुरू झाला , परदेशी ..विशेषतः इंग्रजी मध्ये बरच साहित्य AUDIO PUSTAK रूपात मिळत . इतकच काय जेव्हा एखाद पुस्तक प्रकाशित होत तेव्हा त्याची audio cd ही तुम्हाला मिळते .मग हेच आपल्या मराठी साहित्याच्या बाबतीत का घडू नये ?अस मनात आल .
त्याच साठी आता विविध मराठी साहित्य AUDIOPUSTAK रूपात सादर करणार आहे .. त्याबद्दल सविस्तर लवकरच ....
तुमच्या यावर प्रतिक्रिया अपेक्षित आहेतच
स्वाति सुब्रमण्यम